Shabari Adivasi Gharkul Yojana 2025 मित्रांनो, जर तुम्ही अनुसूचित जमातीचे (Scheduled Tribes) रहिवासी असाल आणि स्वतःचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न बघत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्वाची योजना आहे – शबरी आदिवासी घरकुल योजना 2025. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत ही योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 269 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
शबरी आदिवासी घरकुल योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
Shabari Adivasi Gharkul Yojana 2025
✅ योजनेचे उद्दिष्ट:
- अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सुरक्षित, पक्के घर उपलब्ध करून देणे.
- दुर्गम भागातील गरजू लाभार्थ्यांना प्राधान्य.
👥 लाभार्थी पात्रता
- अर्जदार अनुसूचित जमातीचा असावा.
- महाराष्ट्रात किमान 15 वर्षांचा वास्तव्य असावा.
- अर्जदाराकडे स्वतःची किंवा सरकारद्वारे दिलेली जमीन असावी.
- पक्के घर नसावे.
- विधवा, निराधार, परित्यक्ता महिलांना प्राधान्य.
- उत्पन्न मर्यादा:
- ग्रामीण भाग: ₹1.00 लाख
- नगरपरिषद क्षेत्र: ₹1.50 लाख
- महानगरपालिका क्षेत्र: ₹2.00 लाख
शबरी आदिवासी घरकुल योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
💰 घरकुलासाठी आर्थिक मर्यादा:
क्षेत्र | कमाल खर्च |
---|---|
ग्रामीण (साधारण) | ₹1.32 लाख |
ग्रामीण (नक्षलग्रस्त/डोंगराळ) | ₹1.42 लाख |
नगरपरिषद क्षेत्र | ₹1.50 लाख |
महानगरपालिका क्षेत्र | ₹2.00 लाख |

📄 आवश्यक कागदपत्रे:
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- जातीचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- 7/12 उतारा व 8-अ नमुना
- वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचेकडून)
- ग्रामसभेचा ठराव
- इतर शासन निर्दिष्ट कागदपत्रे
शबरी आदिवासी घरकुल योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
अर्जाचा नमुना:
शबरी आदिवासी घरकुल योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
संपर्क अधिकारी:
संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.