परीक्षा नाही, थेट मेरिट लिस्टवर निवड | Post GDS Bharti 202

Post Office GDS Recruitment 2025 अंतर्गत GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), आणि डाक सेवक पदांसाठी 21,413 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज भरावा. उमेदवारांना 10वी उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालवण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.

ही भरती मेरिट लिस्टच्या आधारे होणार आहे, जिथे दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवारांनी अर्ज करताना गुण आणि ग्रेड योग्य प्रकारे नमूद करणे आवश्यक आहे, कारण फक्त ग्रेड असलेल्या अर्जदारांचे अर्ज रद्द केले जाऊ शकतात. उमेदवारांचे वय 03 मार्च 2025 पर्यंत 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे. तसेच, SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

BPM पदासाठी ₹12,000/- ते ₹29,380/-, तर ABPM आणि डाक सेवक पदांसाठी ₹10,000/- ते ₹24,470/- पगार मिळणार आहे. सामान्य/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹100/- परीक्षा फी असून, SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांना कोणतीही फी नाही. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भारतीय डाक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.indiapost.gov.in) भरायचा आहे. अर्जात सुधारणा करण्याची संधी 06 ते 08 मार्च 2025 दरम्यान मिळेल.

Post Office GDS Recruitment 2025

घटकमाहिती
संस्थाभारतीय डाक विभाग (India Post)
एकूण जागा21,413
पदाचे नाव1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)3) डाक सेवक
शैक्षणिक पात्रता(i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान
वयोमर्यादा18 ते 40 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
परीक्षा फीजनरल/OBC/EWS: ₹100/-SC/ST/PWD/महिला: फी नाही
पगारBPM: ₹12,000/- ते ₹29,380/-ABPM/डाक सेवक: ₹10,000/- ते ₹24,470/-
निवड प्रक्रियासिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्टच्या आधारे
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख03 मार्च 2025
अर्ज संपादित करण्याची तारीख06 ते 08 मार्च 2025
अधिकृत संकेतस्थळwww.indiapost.gov.in
महत्वाची सूचना :  मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Post office gds notification 2025 Notification PDF

DOT Maharashtra Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटOfficial Website
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा