आनंदाची बातमी! म्हाडाची 5285 घरांसाठी मोठी लॉटरी; ‘या’ दिवशी तुमचं घर बुक करा!

MHADA News : म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. MHADA कोकण मंडळाकडून 5285 घरांसाठी लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये घरे आणि भूखंड मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये ठाणे, वसई, बदलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोकेशन्सचा समावेश आहे.

या योजनेमध्ये विविध गटांतील नागरिकांसाठी घरांची नोंदणी करण्यात आली आहे. 20% सर्वसमावेशक योजनेतील 565 घरे, 15% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील 3,002 घरे, तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 1,677 घरे आणि परवडणाऱ्या गटातील 41 घरे अशा प्रकारे ही घरे वितरीत होणार आहेत. याशिवाय, 77 भूखंड देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लॉटरीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या घरांची संधी मिळणार आहे.

Join MissionCareers Social Handles

लॉटरीचं वेळापत्रक देखील MHADA ने स्पष्ट केले आहे. 14 जुलै 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत असून, 13 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. अनामत रक्कम भरायची अंतिम तारीख 14 ऑगस्ट आहे. त्यानंतर प्रारूप यादी, अंतिम यादी आणि संगणकीय लॉटरीचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता लॉटरीची सोडत होणार आहे.

इच्छुक अर्जदारांनी www.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज लवकरात लवकर नोंदवावा. ही लॉटरी MHADA कोकण मंडळाच्या अंतर्गत असल्यामुळे मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांतील नागरिकांसाठी ही मोठी संधी आहे. अर्ज करण्यापूर्वी योजनेचे सर्व नियम, पात्रता निकष आणि स्थानिक तपशील काळजीपूर्वक वाचावेत.

नोट : सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ, दलाल, मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच, अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोंकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही.

फक्त मुलाखतीतून निवड! अर्जाची गरज नाही! वेतन 35,000 मिळेल

📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.