Majhi Ladki Bahin Yojana July 2025 राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं शासन निर्णय जारी करुन जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. हा शासन निर्णय 30 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे.
✅ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे.
➡️ “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या उद्दिष्टाखाली रु.28290 कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतूदीमधून रु.2984 कोटी लाडक्या बहिणींना वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
➡️ सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे.
➡️ सदरचा मंजूर करण्यांत आलेला (रु. 2984 कोटी) निधी राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तात्काळ जमा करण्याची कार्यवाही करावी.
➡️ सदर योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभहस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभ अदा करावा.
🏦 जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी वर्ग
➡️ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निधीचं वितरण करण्यासाठी 2984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
➡️ जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारनं मंजुरी दिली असल्यानं जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे.
➡️ 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
📍दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना येत्या दोन ते तीन दिवसात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता वर्ग केला जाऊ शकतो. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरु झाल्यापासून 13 वा हप्ता मिळणार आहे.
पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज फक्त ३४० रुपये गुंतवा अन् ७ लाख मिळवा
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.