महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग मेगाभरती 18882 जागा 12वी पास साठी नोकरी

Mahila Bal Vikas Vibhag Mega Bharti 2025 महिला व बालविकास विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला असून, विभागातील 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने 70,000 पदे भरण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील मोठा वाटा हा महिला व बालविकास विभागासाठी राखीव आहे. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी मोठ्या संख्येने संधी उपलब्ध होणार आहेत.

14 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया पार पडणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पारदर्शक प्रक्रिया राबवण्यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच, राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Join MissionCareers Social Handles

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5,639 अंगणवाडी सेविका आणि 13,243 अंगणवाडी मदतनीस पदे भरण्यात येणार आहेत. एकूण 18,882 रिक्त पदे उपलब्ध असल्यामुळे ही इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. या भरतीमुळे विशेषतः महिला उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे बोलले जात आहे.

अद्याप विभागाने भरती प्रक्रियेच्या तारखा निश्चित केल्या नाहीत. मात्र, लवकरच संपूर्ण भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर अपडेट्ससाठी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवणे गरजेचे आहे. शैक्षणिक पात्रता, अनुभव, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याविषयी अधिकृत सूचना प्रसिद्ध झाल्यावर अर्ज करणे सोयीचे ठरेल.

महिला व बालविकास विभागात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांची उपलब्धता होणार असल्याने ही महिला उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. या भरतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्थिर आणि सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी योग्य ते नियोजन आणि तयारी करणे आवश्यक आहे.

महत्वाची सूचना :  मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Women and Child Department bharti 2025

या भरतीच्या काही महत्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा