मुख्यमंत्री माझी ladki bahin yojana new update योजनेतील महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अद्याप ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना लवकरच एकत्रितरित्या जून आणि जुलै महिन्याचे 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की तांत्रिक कारणांमुळे काही महिलांना हप्ता मिळण्यास विलंब झाला आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही लाभार्थींच्या खात्यावर जूनचा हप्ता जमा झाला असला तरी, अनेक महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक महिलांना असे वाटत आहे की त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे का, याची खात्री करत आहेत.
सरकारने यासंदर्भात स्पष्टीकरण देत सांगितले आहे की, तांत्रिक अडचणीमुळे पैसे वेळेवर न मिळालेल्या महिलांना काळजी करण्याची गरज नाही. लवकरच त्यांच्या खात्यात दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित म्हणजेच 3000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महिलांनी आपले बँक खाते नियमित तपासावे आणि काही दिवसांत रक्कम न मिळाल्यास स्थानिक महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा.
या योजनेचा आतापर्यंत 12 हप्त्यांचा लाभ महिलांना मिळालेला आहे. आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, तो हप्ता जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी थोडा संयम बाळगावा व खात्यावर लक्ष ठेवावे.
घरी बसून कमवा ३०,००० रुपये महिना – जाणून घ्या ५ बेस्ट ऑनलाइन कामं
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.