ladki bahin yojana new scheme लाडक्या बहिणींसाठी मोठी खूशखबर समोर आली आहे. लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत 40 हजारांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे.
महाराष्ट्रात ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहिण योजनेतील महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे. यंदा दहावा हप्ता वितरीत झाला आहे. आता सरकार या योजनेसाठी आणखी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
40 हजारांपर्यंत कर्ज कसे मिळणार
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजीत पवार लाडक्या बहिणींना राज्यसरकार दरमहा दीड हजार रुपये देते, या योजनेवर जवळपा, 45 हजार कोटी रुपये खर्च होतात. या योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हप्त्यात थोडासा विलंब झाला तर विरोधक ही योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवतात, त्यावर विश्वास ठेवू नका. ही योजना बंद होणार नाही असेही ते म्हणाले.
कर्जाबद्दल अजित पवारांची माहिती* अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. मी जिल्ह्यातील बँकेसोबत संवाद साधणार आहे. काही सहकारी बँका चांगल्या असून लाभार्थ्यांना चाळीस हजारांपर्यंत कर्ज देऊन कर्जाचा हप्ता योजनेतून वळते केले जातील असंही ते म्हणाले.
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.