लाडकी बहीण योजना 2025 अंतर्गत राज्यातील हजारो महिलांना ₹1500 चा मासिक लाभ दिला जात आहे. मात्र, आता शासनाकडून अर्जांची पुनर्तपासणी (Verification) केली जात असून अपात्र लाभार्थी महिलांचे अर्ज रद्द करून जमा झालेले पैसे परत घेतले जाणार आहेत.
सध्या राज्य सरकारने Ladki Bahin Yojana Apatrata संदर्भात काटेकोर तपासणी सुरु केली आहे. जर तुम्ही सरकारी योजना लाभार्थी, आयकर भरदारी, किंवा उच्च उत्पन्न गटातले असाल, तर तुमचा अर्ज अवैध घोषित होऊ शकतो. शासन आधार कार्ड नंबरच्या आधारे डेटा फिल्टर करत आहे आणि ज्या महिलांनी एकाच वेळी इतर योजनांचा लाभ घेतला आहे, त्यांचे अर्जही Ladki Bahin Yojana Apatrata अंतर्गत रद्द होणार आहेत.
अर्जाचा अपात्रता स्टेटस ऑनलाईन इथे पहा
Ladki Bahin Yojana Apatrata
- ✅ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- ✅ कुटुंबातील कोणीतरी आयकर भरत असल्यास लाभ रद्द केला जाऊ शकतो.
- ✅ सरकारी नोकरी, उपक्रम, मंडळात कार्यरत अथवा सेवानिवृत्त व्यक्ती असल्यास अर्ज अपात्र.
- ✅ दरमहा ₹1500 पेक्षा जास्त इतर शासकीय योजनांचा लाभ घेतल्यास अर्ज रद्द.
- ✅ कुटुंबातील व्यक्ती विद्यमान किंवा माजी आमदार/खासदार असल्यास अर्ज रद्द.
- ✅ सरकारी मंडळ/बोर्डचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष असलेल्या कुटुंबातील महिलांना लाभ नाही.
- ✅ चारचाकी (ट्रॅक्टर वगळून) कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत असल्यास अर्ज अपात्र.
अर्जाचा अपात्रता स्टेटस ऑनलाईन कसा तपासाल
तुमचा अर्ज अपात्र झालाय का हे पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- अधिकृत पोर्टलला भेट द्या – https://ladakibahin.maharashtra.gov.in
- “यापूर्वी केलेले अर्ज” या टॅबवर क्लिक करा
- Application Status कॉलम मध्ये तपासा – “Sanjay Gandhi – Yes” असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
- अर्ज मंजूर झाला आहे का, ते देखील इथेच कळेल
तुमचे पैसे कुठल्या बँकेत आले ते कसे पाहाल?
- वरच्याच पोर्टलवर लॉगिन करा
- “Application Transaction History” आयकॉनवर क्लिक करा
- येथे लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँकेत आले ते तपासू शकता
- अनेक महिलांचे पैसे आधार लिंक असलेल्या इतर खात्यांमध्ये जमा झालेले असू शकतात