मित्रांनो, HSC Result 2025 Maharashtra Board च्या निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) तर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. यावर्षी राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, आता ते आपला 12वीचा निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपला Seat Number आणि आईचे नाव वापरून अधिकृत संकेतस्थळांवरून निकाल पाहावा.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स खालीलप्रमाणे आहेत: mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, आणि mahahsscboard.in. या वेबसाइट्सवर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण, एकूण टक्केवारी, आणि आवश्यक असल्यास उत्तरपत्रिकेची छायाप्रती, गुणपडताळणी, तसेच पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पुन्हा संधी हवी असेल, तर श्रेणीसुधार योजना अंतर्गत तो परीक्षेला बसू शकतो.
HSC Result 2025 Maharashtra Board
यावर्षी 12वीच्या परीक्षा पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर, आणि कोकण या 9 विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर, काही विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यामुळे, निकाल पाहिल्यानंतर तुमच्या गुणांची नीट तपासणी करा आणि पुढील शिक्षणाच्या टप्प्यांसाठी योग्य निर्णय घ्या.
💻 टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
🌐 वेबसाइट 1 | येथे क्लिक करा |
🌐 वेबसाइट 2 | येथे क्लिक करा |
🌐 वेबसाइट 3 | येथे क्लिक करा |
🌐 वेबसाइट 4 | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.