सर्वांना नमस्कार!- सरकारच्या घरकुल योजनेंतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना घरकुल (घर बांधण्यासाठी) अनुदान दिले जाते. ही योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाते. प्रत्येक वर्षी नवीन लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. Gharkul Yadi 2025 म्हणजेच नवीन लाभार्थ्यांची यादी आता जाहीर झाली आहे. अनेकांना प्रश्न असतो, “माझं नाव घरकुल यादीत आहे का?” तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे!
घरकुल योजना ही केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) आणि राज्य शासनाची ग्रामविकास विभाग/महापालिका/झेडपी योजनेंतर्गत चालवली जाते. या योजनेतून लाभार्थ्यांना आर्थिक मदत (अनुदान) देऊन स्वतःचं पक्कं घर बांधता येते.
📲 नवीन घरकुल यादी 2025 मोबाईलवर कशी तपासाल? (Step by Step Guide)
प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी पाहण्याची ही नवीन पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत कोणीच सांगणार नाही तर चला पाहूया.
1) प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या वेबसाईट वरती जावे लागेल.
घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी
2) त्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
3) तुमचं All State च्या ठिकाणी राज्य निवडा ,जिल्हा निवडा तालुका निवडा , गाव निवडा. अशी सर्व माहिती अचूक पद्धतीने टाका.
4) त्यानंतर खाली तुम्हाला The Answer is या पर्यायात अचूक माहिती भरावी लागेल कारण खूप जण इथे चुकता आणि सांगतात की माहिती चुकीची दिली म्हणून त्याच्यासाठी व्यवस्थित पणे उत्तर द्या.
5) सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
6) तुमच्या गावात तुम्ही जेव्हा चेक करत आहेत तेव्हा जर का घरकुल मंजूर झाले असतील तर मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांची नावे तुम्हाला दिसतील.
7) तुम्ही त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता.
8) अशा पद्धतीने तुम्ही फक्त एका मिनिटात मोबाईल मधून घरकुल योजना नवीन यादी पाहू शकता तसेच डाऊनलोड करू शकता.
Gharkul Yojana Yadi 2025 – घरकुल योजना नवीन यादी मोबाईल मधून कशी पाहायची हे व्हिडिओ च्या द्वारे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा