खूप जणांना वाटतं की CIBIL स्कोअर 700 च्या खाली गेलं की बँका किंवा फायनान्स कंपन्या कर्ज देत नाहीत. मात्र, हे पूर्णपणे खरं नाही. जरी तुमचा CIBIL स्कोअर 700 पेक्षा कमी असला, तरी काही पर्यायांमधून तुम्हाला कर्ज मिळू शकतं – फक्त योग्य योजना आणि स्ट्रॅटेजी वापरणं गरजेचं आहे.
जर तुमचा क्रेडिट स्कोअर 650, 600 किंवा त्याहून कमी असेल तरीही निराश होण्याचं कारण नाही. बाजारात काही अशी बँका, NBFC (Non-Banking Financial Company), आणि डिजिटल लेंडिंग अॅप्स आहेत जे कमी स्कोअरवरही कर्ज देतात – मात्र त्यासाठी काही अटी लागू होतात.
CIBIL स्कोअर म्हणजे काय?
CIBIL स्कोअर हा तुमच्या क्रेडिट बिईहवियरवर आधारित 300 ते 900 पर्यंतचा एक आकडा असतो. 700 पेक्षा अधिक स्कोअर असल्यास त्याला चांगला स्कोअर मानले जाते आणि त्यामुळे कर्ज मंजुरी सहज होते.
700 पेक्षा कमी स्कोअर असल्यास काय अडचणी येतात?
जर तुमचा CIBIL स्कोअर 700 पेक्षा कमी असेल, तर कर्ज नाकारले जाऊ शकते, व्याजदर जास्त लागतो, किंवा बँक को-गॅरंटर अथवा गहाण ठेवण्याची मागणी करते. त्यामुळे स्कोअर कमी असेल, तर योग्य रणनीती गरजेची आहे.
700 च्या खाली स्कोअर असूनही कर्ज मिळवण्याचे उपाय
कमी स्कोअर असला तरी काही NBFC किंवा Microfinance कंपन्या कर्ज देतात. याशिवाय, जर तुमच्याकडे को-अप्लिकंट असेल ज्याचा स्कोअर चांगला आहे, तर कर्ज मंजुरीची शक्यता वाढते. तुम्ही सिक्युअर्ड लोन देखील घेऊ शकता, जसे की गोल्ड लोन किंवा Fixed Deposit वर मिळणारे कर्ज. कर्जाची रक्कम कमी ठेवून आणि वेळेपूर्वी फेडण्याची तयारी दाखवूनही कर्ज मिळवता येते. याशिवाय, काही डिजिटल लेंडिंग अॅप्स जसे की PaySense, KreditBee हे कमी स्कोअरवरही लहान कर्ज देतात.
कर्ज मंजुरीसाठी लागणारी कागदपत्रे
कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र (जसे की Aadhaar कार्ड, PAN कार्ड), उत्पन्नाचा पुरावा (पगार पावत्या किंवा ITR), आणि बँक स्टेटमेंट असणे आवश्यक आहे. जर को-गॅरंटर असेल, तर त्याची माहिती व कागदपत्रे देखील आवश्यक ठरतात.
कर्ज घेतल्यावर स्कोअर सुधारण्याचे फायदे
जर तुम्ही घेतलेलं कर्ज वेळेवर फेडलंत तर तुमचा CIBIL स्कोअर सुधारतो. पुढच्या वेळी कर्ज घेण्यासाठी चांगल्या व्याजदरावर मंजुरी मिळते. यासोबतच, क्रेडिट कार्ड्स मिळवण्याचं कामही सोपं होतं.