Bandhkam Kamgar Yojana Safety Kit Scheme 2025 : Construction Workers Welfare Scheme Maharashtra या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी 13 प्रकारच्या वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंमध्ये सुरक्षा साहित्य, कौटुंबिक उपयोगाच्या वस्तू व आरोग्यविषयक सुविधा यांचा समावेश आहे. यामागचा उद्देश कामगारांचे जीवनमान उंचावणे व त्यांच्या कुटुंबाला थोडा आधार देणे हा आहे.
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना शासनाकडून थेट लाभ देण्यात येतो. हे लाभ मिळवण्यासाठी काही आवश्यक अटी व कागदपत्रे असतात. योग्य कागदपत्रांसह नोंदणी केल्यानंतर लाभ मिळवणे सोपे होते.
Free Bhandi Set Yojana Maharashtra 2025
वस्तूंचा प्रकार | तपशील |
---|---|
हेल्मेट | डोक्याच्या सुरक्षिततेसाठी |
हातमोजे | हातांची संरक्षणासाठी |
बूट | सुरक्षित कामासाठी गरजेचे |
चष्मे | डोळ्यांचे संरक्षण |
अंगरखा / सेफ्टी जॅकेट | अंगभर संरक्षणासाठी |
साबण व सॅनिटरी किट | वैयक्तिक स्वच्छतेसाठी |
प्रथमोपचार पेटी | किरकोळ जखमा व अपघातासाठी |
स्कूल बॅग व साहित्य (पाल्यांसाठी) | कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सहाय्य |
पाण्याची बाटली | उन्हात काम करणाऱ्यांसाठी |
रेनकोट | पावसाळ्यात कामाच्या सोयीसाठी |
सौर दिवा | ग्रामीण भागात काम करणाऱ्यांसाठी |
स्टील डब्बा व पिशवी | जेवणासाठी सोईस्कर |
ओळखपत्र | शासनाच्या विविध लाभासाठी अनिवार्य |
📝 अर्ज प्रक्रिया आणि पात्रता:
बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस – MBOCWWB Household Item Kit:
बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा (MBOCWWB Household Item Kit) संच योजनेसाठी अर्ज ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने करता येते:
टप्पा 1: नोंदणी क्रमांक मिळवा:
बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा (MBOCWWB Household Item Kit) संच योजनेसाठी नोंदणी क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
https://iwbms.mahabocw.in/profile-login
पोर्टल ओपन केल्यनानंतर आपला आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि ‘Proceed to Form’ वर क्लिक करा.

आता तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो टाकून ‘Validate OTP’ करा. पुढे तुमचा BOCW नोंदणी क्रमांक मिळेल, तो कॉपी करून किंवा लिहून ठेवा.
टप्पा 2: कामगार – वैयक्तिक तपशील:
नोंदणी क्रमांक भेटल्यानंतर आता वैयक्तिक तपशील भरण्यासाठी खालील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
https://hikit.mahabocw.in/appointment
पोर्टल ओपन केल्यनानंतर “कामगार – वैयक्तिक तपशील” हे पेज उघडेल. मिळवलेला नोंदणी क्रमांक टाका.

नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर ‘बाहेर क्लिक’ करा म्हणजे आपली सर्व माहिती आपोआप भरली जाईल.
पुढे Select Camp / शिबिर निवडा – आपल्याजवळील केंद्र निवडा आणि Appointment Date निवडा – उपलब्ध तारीख निवडा.(सूटीच्या दिवशी किंवा फुल्ल झालेल्या स्लॉटवर नियुक्ती मिळणार नाही.)
टप्पा 3: स्वघोषणपत्र अपलोड करा
- तुमचे Self Declaration Form डाउनलोड करून प्रिंट काढा आणि सर्व आवश्यक तपशील भरून स्कॅन करा किंवा मोबाईलने फोटो काढा.
- स्कॅन किंवा मोबाईलने स्व-घोषणापत्राचा फोटो काढलेला ऑनलाइन फॉर्ममध्ये स्व-घोषणापत्र फाईल अपलोड करा.
टप्पा 4: अपॉइंटमेंट प्रिंट घ्या
- पुढे ‘PRINT APPOINTMENT’ वर क्लिक करा.
- दिलेल्या तारखेचा अपॉइंटमेंट स्लिप प्रिंट करून ठेवा.
- निवडलेल्या दिवशी संबंधित शिबिरात उपस्थित राहा आणि घरगुती वस्तूंचा संच (MBOCWWB Household Item Kit) प्राप्त करा.
✅ फायदे आणि महत्त्व
या योजनेमुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेत वाढ होते. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही शैक्षणिक व आरोग्यविषयक मदत मिळते. या उपक्रमामुळे सामाजिक आणि आर्थिक विकास साध्य होतो.
ही योजना “Construction Workers Welfare Scheme Maharashtra” अंतर्गत राबवली जात आहे. या योजनेचा लाभ वेळेत घेण्यासाठी कामगारांनी लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे.