ladki bahin e-KYC online link : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना थेट खात्यातून आर्थिक लाभ दिला जातो. पण अलीकडच्या काळात अनेक अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता शासनाने e-KYC अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
✅ म्हणून आता आता सरकारने महिलांचे ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असून या संदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
🧐 परिपत्रकात नेमकं काय?
➡️ मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार अधिनियम, 2016 च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने दि. 09.08.2024 अन्वये शासन अधिसुचना अधिसूचित केली आहे.
➡️ सदर अधिसूचनेनुसार “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे.
➡️ मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्याचे e-KYC करायचे आहे.
📜 शासन परिपत्रक जसेच्या तसे…
1️⃣ “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
2️⃣ “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या Web Portalवर सदरची e-KYC ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
3️⃣ त्यानुषंगाने या Web Portal वर लाभार्थ्यांना प्रथ्यक्षात e-KYC बाबत करावयाची कार्यवाहीची माहितीचा Flowchart ‘परिशिष्ट – अ’मध्ये देण्यात आला आहे.
4️⃣ त्यानुसार सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
5️⃣ सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी Aadhar Authentication केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील, याची कृपया नोंद घ्यावी.
6️⃣ तसेच या योजनेंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी e-KYC करणे बंधनकारक राहील.
👉 शासन निर्णय पाहा:
https://tinyurl.com/2jba3e6t
✒️ नोट: लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींनी 18.09.2025 ते 17.11.2025 या तारखेदरम्यान आपली KYC पूर्ण करून घ्यावी.
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.