‘लाडकी बहीण’ पैसे बंद झाले, पण सरकारच्या या 4 योजनाही देतात महिन्याला 1500 रुपये, तुम्हीही पात्र आहात का पहा?

Government Schemes Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यातील तरुणी आणि महिलांना या योजनेचा सध्या लाभ होतोय.

 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यातील तरुणींना आणि महिलांना या योजनेचा सध्या लाभ होतोय. जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झालीये.  21 ते 60 वयोगटातील तरुणी आणि महिलांना या योजनेचा लाभ घेता येतोय. मात्र, यासाठी उत्पन्नाची अट घालण्यात आली आहे. वर्षाला  2,50,500 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येत आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत असली तरी सरकारच्या 4 आणखी अशा योजना आहेत, ज्या तुम्हाला 1500 रुपये मिळवून देऊ शकतात. त्यासाठी पात्रता काय आहे? हे जाणून घेऊयात… 

Join MissionCareers Social Handles

Government Schemes Yojana

  • पात्रता – 21 ते 60 वयोगटातील महिला, वार्षिक उत्पन्न ₹2,50,500 पेक्षा कमी, महाराष्ट्रातील रहिवासी.
  • लाभ – दरमहा ₹1500 थेट बँक खात्यात.
  • अर्ज कसा करावा – Aaple Sarkar Portal किंवा स्थानिक तहसील कार्यालयात.
  • विशेष बाब – महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू झालेली ही योजना ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी उपयुक्त.

संजय गांधी निराधार अनुदान योजना

  • पात्रता – विधवा, दिव्यांग (किमान 40%), दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नी, 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री.
  • लाभ – दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य.
  • कागदपत्रे – वयाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, पतीचा मृत्यू दाखला (विधवेसाठी), दिव्यांगत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक.

संजय गांधी निराधार अनुदान योजना शासन निर्णय/ GR पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

योजनेचा अर्ज कसा व कोठे करावा हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

अर्ज कुठे करावा ? 

तहसील कार्यालय, सेतु केंद्र, :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

  • पात्रता – 65 वर्षे व त्यावरील निराधार वृद्ध, BPL यादीत समाविष्ट किंवा वार्षिक उत्पन्न ₹21,000 पेक्षा कमी.
  • लाभ – केंद्रातून ₹200 आणि राज्यातून ₹400 मिळून एकूण ₹600 मासिक पेन्शन.
  • विशेष बाब – गट A (BPL यादीत) आणि गट B (BPL यादीत नसले तरी उत्पन्न मर्यादा पूर्ण) असे दोन प्रकार.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना (PDF पहा ) 

योजनेचा अर्ज कसा व कोठे करावा हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

अर्ज कुठे करावा ?

तहसील कार्यालय, सेतु केंद्र, – https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate

4) इतर दोन महत्वाच्या योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

  • पात्रता – 65 वर्षांवरील BPL यादीतील निराधार वृद्ध.
  • लाभ – दरमहा ₹200 (केंद्र) + राज्य पुरक योजना मिळून ₹600.
  • कागदपत्रे – वयाचा दाखला, BPL प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक.
  • उद्देश – वृद्धांना आर्थिक स्थैर्य देणे व त्यांचा आत्मसन्मान टिकवून ठेवणे.

इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन (PDF :- येथे पहा ) 

अर्ज कसा व कोठे करावा हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

अर्ज कुठे करावा ?

तहसील कार्यालय, सेतु केंद्र, https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate 

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

  • पात्रता – 18 ते 79 वयोगटातील किमान 80% दिव्यांगत्व असलेले BPL लाभार्थी.
  • लाभ – दरमहा ₹300 (केंद्र) + राज्य पुरक योजना मिळून ₹600.
  • कागदपत्रे – दिव्यांगत्व प्रमाणपत्र, BPL प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक.
  • विशेष बाब – आर्थिक सहाय्यामुळे दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय व दैनंदिन खर्च भागविण्यास मदत.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना (पीडीफ,4.4 MB) 

अर्ज करा

Project Details

संपर्क व्यक्ती: अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा

पत्ता: गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालय

तहसील कार्यालय, सेतु केंद्र, https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate 

5) अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

सर्व योजनांसाठी अर्ज तहसील कार्यालय, सेतु केंद्र किंवा Aaple Sarkar Portal वर ऑनलाइन करता येतो.
सामान्य कागदपत्रांची यादी

  • विहीत नमुन्यातील अर्ज
  • वयाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र (किमान 15 वर्ष वास्तव्य)
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • अर्जदाराचा फोटो
    विशेष कागदपत्रे – पतीचा मृत्यू दाखला, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, दुर्धर आजार प्रमाणपत्र इत्यादी योजना-विशिष्ट अटींनुसार आवश्यक.