DBSKKV Ratnagiri Bharti 2025 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत वाकवली (मध्यवर्ती संशोधन केंद्र) येथे JCB / ट्रॅक्टर वाहन चालक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. केवळ १ पदासाठी ही भरती असून, उमेदवारांकडे किमान चौथी उत्तीर्ण असणे आणि JCB/ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना व किमान २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०२५ आहे.
DBSKKV Ratnagiri Bharti 2025
- संस्था : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली – रत्नागिरी
- भरतीचे ठिकाण : मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी
- पदाचे नाव : JCB / ट्रॅक्टर वाहन चालक
- पदांची संख्या : 01 पद
- शैक्षणिक पात्रता :
- किमान इयत्ता ४ थी पास
- JCB व ट्रॅक्टर वाहन चालविण्याचा सक्षम परवाना
- संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव
- वयोमर्यादा :
- खुल्या प्रवर्गासाठी : ३८ वर्षांपर्यंत
- आरक्षित प्रवर्गासाठी : ४३ वर्षांपर्यंत
- मानधन / वेतन : प्रति महिना ₹30,000/-
- अर्जाची पद्धत : फक्त ऑफलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख : ७ जुलै २०२५
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० जुलै २०२५, सायं. ५:३० वाजेपर्यंत
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. संचालक, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली, “वाकवली विभाग,” ता. दापोली, जि. रत्नागिरी- ४१५७११.
- अधिकृत संकेतस्थळ : www.dbskkv.org
📑 आवश्यक कागदपत्रे :
- शैक्षणिक प्रमाणपत्रांची झेरॉक्स प्रती
- वाहन परवाना व अनुभव प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधार कार्ड)
- जातीचा दाखला (आरक्षित प्रवर्गासाठी)
- पासपोर्ट साईज फोटो
Notification (जाहिरात) | जाहिरात PDF येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |