PM Vidya Lakshmi Scheme 2025 सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना 2025 अंतर्गत आता तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतचे शिक्षण कर्ज सहज मिळू शकते. या योजनेतून तुम्ही तुमचे इंजिनिअरिंग, मेडिकल, MPSC, UPSC, MBA, इतर उच्च शिक्षण पूर्ण करू शकता.
सरकारने एक खास वेबसाइट सुरू केली आहे जिचे नाव आहे 👉 www.vidyalakshmi.co.in – येथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्या कर्जावरील संपूर्ण व्याज सरकार भरते. दुसरीकडे, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख ते ८ लाख रुपयांच्या दरम्यान आहे, त्यांना व्याजात ३% सूट मिळते. तुम्ही ७.५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले, तर त्यावर ७५% क्रेडिट गॅरंटीदेखील उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कर्ज घेण्यासाठी कोणतीही मालमत्ता नाही, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
PM Vidya Lakshmi Scheme 2025
🔹 योजनेचे नाव – प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2025
🔹 कशासाठी? – शिक्षणासाठी कमी व्याज दरात कर्ज मिळवण्यासाठी
🔹 कर्ज किती मिळेल? – जास्तीत जास्त ₹10 लाख
🔹 व्याज सवलत? – गरीब व मध्यमवर्गीयांना 3% पर्यंत व्याज सवलत
🔹 कोण अर्ज करू शकतो? – ज्यांनी IIT, IIM, NIT, सरकारी महाविद्यालय किंवा टॉप कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे
🔹 कर्जासाठी गहाण लागेल का? – नाही
🔹 अर्ज कुठे करायचा? – www.vidyalakshmi.co.in
🔹 परतफेड कधी सुरू होईल? – शिक्षण संपल्यावर किंवा नोकरी लागल्यावर
💡 या योजनेचे फायदे:
✅ एका अर्जातून 3 बँकांकडे एकत्र कर्जासाठी विनंती करता येते
✅ सरकार 75% कर्जाची हमी देते
✅ काही लोकांना पूर्ण व्याज माफ होऊ शकते (जसे की गरीब कुटुंबातील विद्यार्थी)
✅ कुठल्याही गहाण न देता शिक्षणासाठी पैसे मिळवता येतात
✅ ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे
📝 अर्जासाठी लागणारी कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला (तलाठी / तहसीलदार यांच्याकडून)
- कॉलेज प्रवेश पत्र
- फी पावती
- बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक
- शालेय/कॉलेज मार्कशीट
- फोटो
💻 अर्ज कसा करायचा?
- www.vidyalakshmi.co.in या वेबसाइटवर जा
- नवीन विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन करा
- तुमची माहिती भरून “Common Education Loan Form” भरा
- ज्या बँकांकडून कर्ज घ्यायचे आहे त्या निवडा
- अर्ज सबमिट करा
- बँकेकडून उत्तर येईल आणि कर्ज मंजूर होईल
❓ महत्त्वाचे प्रश्न (FAQ)
Q. माझे घराचे उत्पन्न कमी आहे, तरी मी अर्ज करू शकतो का?
होय! जर तुमचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला व्याजात सवलत मिळेल.
Q. कर्जासाठी जामीनदार लागेल का?
नाही! सरकारच बँकेला हमी देते, त्यामुळे तुम्हाला जामीनदार लागणार नाही.
Q. अर्ज ऑफलाइन करता येईल का?
नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.