पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) ने Junior Resident, Medical Officer – CMO, Medical Officer – Shift Duty (Post Mortem Center), Blood Bank Medical Officer (BTO) अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती तात्पुरत्या स्वरूपात असून, मासिक वेतन संलग्न पद्धतीने दिले जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.pcmcindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर करावा. भरतीसाठी एकूण ६६ रिक्त पदे उपलब्ध असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२५ आहे.
या भरतीसाठी उमेदवारांकडे आवश्यक ते वैद्यकीय शैक्षणिक अहर्ता असणे गरजेचे आहे. MBBS, DCP, MD (Pathology) अशी पात्रता आवश्यक असून MMC नोंदणी अद्ययावत असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीच्या आधारे (Interview Based Selection) होणार आहे. वेतनाच्या दृष्टीनेही ही भरती आकर्षक असून, काही पदांसाठी ₹७५,००० ते ₹८०,०००/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. नोकरीचे ठिकाण पिंपरी, पुणे येथे आहे. ही भरती वैद्यकीय सेवेत काम करण्याची इच्छाशक्ती असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.
📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२५
- संस्था: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Pune)
- पदाचे नाव:
- कनिष्ठ निवासी – ५६ पदे
- वैद्यकीय अधिकारी – CMO – ५ पदे
- वैद्यकीय अधिकारी – शिफ्ट ड्युटी (पोस्टमार्टम सेंटर) – ३ पदे
- ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी (BTO) – २ पदे
- एकूण जागा: ६६
- शैक्षणिक पात्रता:
- MBBS पदवी (MMC नोंदणी अनिवार्य)
- BTO साठी DCP पास व FDA मान्यता आवश्यक, MD (Pathology) प्राधान्य
- वेतन (मासिक):
- MBBS – ₹७५,०००/-
- Diploma – ₹८०,०००/-
- नोकरी ठिकाण: पिंपरी, पुणे
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (www.pcmcindia.gov.in)
- अर्ज सुरु होण्याची तारीख: ०२ जुलै २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ जुलै २०२५
- भरती प्रक्रिया: मुलाखत (Interview Based)
- अधिकृत वेबसाईट: https://www.pcmcindia.gov.in
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
हे वाचले का ? –IBPS अंतर्गत बँकेत 4451 जागेची महाभरती, अर्ज करण्याची हि आहे शेवट तारीख | आत्ताच करा अर्ज…
PCMC Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | pcmcindia.gov.in |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.