Women and Child Department bharti 2025 : सर्वांना नमस्कार, महिला व बालविकास विभागाने (Women and Child Development Department) मोठा निर्णय घेतला असून 18,882 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. राज्य शासनाने 70,000 पदे भरण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी मोठा वाटा महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका आणि 13,243 अंगणवाडी मदतनीस यांना मिळणार आहे.
14 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. भरती प्रक्रियेला पूर्ण पारदर्शकता राहावी, यासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेलाही गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही भरती इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी ठरणार आहे. विशेषतः महिला उमेदवारांना नोकरीच्या संधी मिळणार असून महिला सबलीकरणाला चालना मिळेल. अद्याप भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नसले तरी लवकरच त्यासंबंधी अधिकृत माहिती उपलब्ध होईल.
नोकरीच्या संधी शोधा :
- Happy Raksha Bandhan Wishes | भावपूर्ण रक्षाबंधन शुभेच्छा आणि स्टेटस 2025
- CCRAS मध्ये नर्स, लिपिक, स्टाफ, रिसर्च ऑफिसर भरती | पद, पात्रता, अर्ज लिंक येथे पहा
- मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये, फॉर्म, पात्रता, नोंदणी, कागदपत्रे इथे पहा; असा करा अर्ज..,
- आनंदाची बातमी! ‘महिलांना एक रुपयाही न भरता मिळणार ई-पिंक रिक्षा
- लाडकी बहीण योजना KYC करावी लागेल | Ladki Bahin Yojana eKYC Update|Mazi Ladki Bahin Yojana KYC Option
भरती प्रक्रियेसोबत अंगणवाडी केंद्रांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यावरही भर दिला जात आहे. शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्यांचा वापर, पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची उपलब्धता, तसेच नगरपालिका स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती यासारखे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य सरकार महिला आणि बालविकासासाठी कटिबद्ध असून, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. महिला बचत गटांना प्रोत्साहन, कम्युनिटी किचनद्वारे पोषण आहार पुरवठा, आणि नवीन अंगणवाड्यांची निर्मिती यासारख्या उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
Women and Child Department bharti 2025
या भरतीच्या काही महत्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |